भारताचा बॉक्सर अमित पांघलला सुवर्णपदक

जकार्ता: 

इंडोनेशियातील जकार्ता येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. यास्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत पदकांची लयलूट केली आहे. यात आता आणखी एका पदकाची भर पडली आहे. भारताच्या अमित पांघलने ४९ किलो वजनी गटाच्या बॉक्सिंग सामन्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या हसनबोय दुस्मातोव्हचा पराभव करत भारताला पुरुष गटात बॉक्सिंगमधील पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

घरच्यांच्या विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक

४९ किलो गटाच्या अंतिम लढतीच्या पहिला फेरीत दोन्ही खेळाडूंनी सावध खेळ केला. अमितने सुरेख बचाव करताना उजबेकिस्तानच्या खेळाडूला गुण मिळवण्यापासून रोखले. २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या अमितचा खेळ उल्लेखनीय झाला. त्याने ऑलिम्पिक विजेत्या खेळाडूला तोडीसतोड उत्तर दिले. हरयाणाच्या अमितने २०१७ मध्ये आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. अमितने ३-२अशा फरकाने बाजी मारताला भारताला सुवर्णपदक जिंकून दिले.

[amazon_link asins=’B00KGZZ824,B01MCUSD3L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9a0ff97d-adc9-11e8-a7c8-3b47a228d0ca’]