फुलराणीचे सुवर्ण स्वप्न पुन्हा अपूर्ण 

जकार्ता :

आशियाई स्पर्धेत भारताच्या फुलराणीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. चीनच्या ताई त्झुने सिंधूचा २१-१३, २१-१६ ने पराभव करत सुवर्ण पदक जिंकले.

पहिल्या सेटमध्ये ताई त्झुने या चायनीज खेळाडूने चार गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर सिंधून पुनरागमन करत सेट ३-५  या  गुणसंख्येवर नेला. त्यानंतर मात्र प्रतिस्पर्धी  खेळाडूला रोखण्यात सिंधूला अपयश आले. १७- १० अशी मोठी आघाडी प्रतिस्पर्धी खेळाडूने घेतली आणि नंतर  सेट २१-१३ असा जिंकला.

दुसऱ्या  सेटमध्ये सिंधूने पराथम चांगली लढत दिले. एकावेळी दोन्ही खेळाडू  ४-४ असे बरोबरीच्या गुणसंख्येवर होते. त्यानंतर ताई त्झुनेने आपली आघाडी ९-६ अशी केली. सिंधूच्या खेळातील कमतरता शोधत तिने आपली आघाडी १८-११ अशी केली. दुसरा सेट  २१-१६ असा जिंकत चायनीज ताई त्झुने या खेळाडूने सुवर्ण जिंकल्याने सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. आतापर्यंत ताई त्झुने सिंधूला ९ वेळा पराभूत केलं आहे.

[amazon_link asins=’B07G556924′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ab60f758-aaa3-11e8-b2fc-4740ea323d7a’]
यावर्षी सिंधूला एकही स्पर्धेचे विजेतेपद पटकविताअलेलले नाही. इंडिया ओपन, राष्ट्रकुल स्पर्धा, थायलंड ओपन, जागतीक अजिंक्यपद स्पर्धा आणि आशियाई स्पर्धा या पाच स्पर्धेची तिने उपविजेतेपद पटकाविली आहेत.