महाराष्ट्र कन्येची सुवर्ण पदकाला गवसणी

जकार्ता :

आशियाई स्पर्धेत कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्ण पदक जिंकले. तिने २५ मीटर पिस्तुल प्रकारात भारताला चौथे सुवर्ण पदक मिळवून दिले.. आशियाई शुटिंग स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारी पहिली भारतीय नेमबाज ठरली. याच प्रकारात भारताची मनू भाकर फायनलमधून बाहेर पडली. राहीचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे.

महिलांच्या २५ मी पिस्तुल प्रकारात राहीला सुरुवातीपासूनच थायलंडच्या यांगपाबून हिच्याकडून कडवी झुंज मिळाली. राहीने यावेळी बऱ्याचदा आघाडी मिळवली. सुवर्ण पदकासाठीचा राउंड खूपच अटीतटीचा झाला. दोन वेळा थायलंडच्या यांगपैबूनने बरोबरी साधली . त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात राहीने पाच पैकी चार शॉट ऑन टार्गेट मारले. आणि सुवर्णपदक पटकावले.

राहीचे हे आशियाई स्पर्धेतील पहिले सुवर्ण पदक आहे. यापूर्वी तिने २०१४ मध्ये झालेल्या इंचिओन स्पर्धेत कास्य पदक जिंकले होते. याचबोरबर तिने दिल्ली आणि ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेत तसेच २०१३ ला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते.

[amazon_link asins=’B00XF70POG,B0786N5FGT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’69c7ed1c-a604-11e8-8bc3-657d64f81aac’]