आशियाई स्पर्धेतून किदांबी श्रीकांत बाहेर

जकार्ता:

आशियायी स्पर्धेतून भारताचा पुरुष एकेरीतील स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत बाहेर फेकला गेला आहे. त्याला हॉंगकॉंगच्या वोन्ग विंग की विन्सेंटयाकडून पराभव पत्करावा लागला. श्रीकांतने हा सामना २१-२३ आणि २१-१९ असा गमावला.

[amazon_link asins=’B07FSV992S,B07DMZBW73′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’68bd9565-a799-11e8-a144-99408159079a’]

पहिल्या सेटपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये गुण मिळवण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या सेटमध्ये एकवेळ श्रीकांत ११-९ असा आघाडीवर होता. परंतु त्यानंतर हॉंगकॉंगच्या खेळाडूने सामन्यात पुनरागन करत पाहिलाय सेट २३-२१ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये देखील त्याने आघाडी घेतली . श्रीकांतच्या खेळातील उणिवा शोधत त्याने श्रीकांतवर २१-१९ असा विजय मिळवला. या पराभवामुळे श्रीकांत स्पर्धेबाहेर फेकला गेला .