Asian Games 2023-Rudraksh Patil Thane | एशियन गेम्समध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक, पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा ठरला ‘गोल्डन बॉय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Asian Games 2023-Rudraksh Patil Thane | महाराष्ट्राचा सुपुत्र नेमबाज रुद्राक्ष पाटील याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. चीनमधील फुयांग (हांगजोऊ) येथे सुरु असलेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांच्या संघाने 10 मीटर एअर रायफल्स प्रकारात सुवर्ण कामगिरी केली आहे. ठाण्याच्या रुद्राक्ष पाटील याने गोल्ड मेडल मिळवलं आहे. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले गोल्ड मेडल आहे. (Asian Games 2023-Rudraksh Patil Thane)

कोण आहे रुद्राक्ष?

रुद्राक्ष हा ठाण्यातील असून त्याची आई हेमांगिनी पाटील आरटीओ अधिकारी आहे. तर वडील बाळासाहेब पाटील हे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत. रुद्राक्ष याचे प्रशिक्षक अजित पाटील आहे. मूळचे कोल्हापूरचे असणारे अजित पाटील हे रुद्राक्षला ठाण्यातील कोपरी प्रभागात असलेल्या पीपल्स एज्युकेशन स्कूल येथील शूटिंग रेंज मध्ये प्रशिक्षण देतात. मुंबईतील किर्ती कॉलेजमध्ये बीए च्या पहिल्या वर्षात असलेल्या रुद्राक्ष पंधराव्या वर्षापासून नियमित शूटिंगचा सराव करतोय. आज त्याला गोल्ड मेडल मिळाल्याचा खूप अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक अजित पाटील यांनी दिली. (Asian Games 2023-Rudraksh Patil Thane)

रुद्राक्षच्या या कामगिरीवर वडील पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले, रुद्राक्ष 2015-16 पासून रोज सराव करत आहे. आई-बाबा म्हणून त्याला जी मदत हवीय ती आम्ही दिली. तो त्याच्या ध्येयापासून दूर होणार नाही याची खबरदारी घेतली. त्याच्या या यशात त्याची टीम, कोच, फिजिओ आणि मानसपोचार तज्ज्ञांचा मोठा वाटा आहे. आज त्यानं देशासाठी मेडल जिंकल्याचा मोठा अभिमान वाटतो, असे पाटील यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक
पटकावले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील रुद्राक्ष बाळासाहेब पाटील,
दिव्यांश सिंह पनवार, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर यांचे अभिनंदन केले.

या भारतीय त्रिकुटाने चीन येथील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशिया स्पर्धा 2023 या स्पर्धेतील पुरुषांच्या
नेमबाजी विभागातील 10 मीटर एअर रायफल सांघिक स्पर्धेत अव्वल स्थान पटकावत सुवर्ण पदकावर आपली
मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेतील भारताचे हे पहिले सुवर्ण आहे. दिव्यांश पनवार, ऐश्वरी प्रताप सिंग तोमर आणि
रुद्रांक्ष पाटील यांचे मनःपूर्वक अभिनंदन तसेच नेमबाजी खेळातील भावी कामगिरीकरता हार्दिक शुभेच्छा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ACB Trap Case | 35 हजार रुपये लाच घेताना जिल्हा जात पडताळणी समितीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Auction Sealed Properties PMC Property Tax Due | मिळकतकर थकल्याने सील केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव; महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची माहिती