आशिया खंडातील महागड्या शहरांमध्ये मुंबईचा ‘नंबर’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई म्हणजे स्वप्नांचे शहर असे म्हटले जाते. इथे आलेला कोणताही माणूस उपाशी जात नाही असे म्हटले जाते. त्याचबरोबर हे शहर सर्वांचे स्वप्न पूर्ण करते असे देखील म्हटले जाते. मात्र हेच मुंबई शहर भारतातील सर्वात महागडे शहर ठरले आहे. त्याचबरोबर संपूर्ण आशिया खंडात देखील हे शहर महागडे ठरले आहे. आशिया खंडातल्या टॉप २० महागड्या शहरांच्या यादीत देखील मुंबईचा समावेश आहे. या यादीत मुंबई १२ व्या स्थानावर आहे. परदेशी पर्यटकांसाठी मुंबई सर्वात महागडे शहर आहे तर कोलकाता हे सर्वात स्वस्त आहे.

यामध्ये एकुण पाच खंडांतल्या २०९ शहरांचा अभ्यास करण्यात आला. त्यात वेगवेगळे निकष लावण्यात आले आहेत. यामध्ये राहण्याचा खर्च, प्रवास, खाणं, कपडे, घर चालवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि मनोरंजन या निकषांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे महागाई दर तसेच डॉलरच्या किंमतींत होणारी चढ उतार या बाबींचा देखील अभ्यास केला जातो.

देशातल्या इतर शहरांचं स्थान

मुंबई : १२ वे स्थान
नवी दिल्ली: ११८ वे स्थान
चेन्नई : १५४ वे स्थान
बंगळुरू: १७९ वे स्थान
कोलकाता: १८९ वे स्थान

दरम्यान, या यादीत हाँगकाँग सर्वात महाग शहर ठरलंय. त्यानंतर टोकियो, सिंगापूर आणि सियोल यांचं स्थान आहे. तर जगभरातील स्वस्त शहरांमध्ये ट्युनिस, ताश्कंद आणि कराची यांचा नंबर लागतो.

 

आवडीने खाल्लं जाणारं ‘बिस्कीट’ आरोग्यासाठी धोकादायक

हळद ‘या’ आजारांवर आहे गुणकारी

तबरेज अंसारी मॉब लिंचिंग विरोधात पुण्यात आक्रोश आंदोलन

जमावाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पहलू खानवरच गुन्हा दाखल

आमिर खानसोबत चित्रपटात काम केलेल्या ‘या’ अभिनेत्रीने शेअर केला लहानपणीचा फोटो

लग्नाच्या ७ व्या वाढदिवसाला ईशा देओलने शेयर केला ‘ब्लॅक अँड व्हाईट..’

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like