कठुआ सामूहिक बलात्कार : कुटुंबीयांनी घर सोडले

कठुआ : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल मिळाला असून, या अहवालानुसार, या नराधमांनी पीडित बालिकेवर अत्यंत क्रूरपणे अत्याचार केले.

”बकरवाल समाजातील आठ वर्षीय बालिकेचे अपहरण जानेवारी महिन्यात करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात जम्मू-काश्मीर पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केल्यापासून संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे.

या परिसरातील राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला हटवण्याचे हे एक कारस्थान होते”, असे या घटनेतील आरोपीने सांगितले.
आरोपींवर पंधरा पानी चार्जशीट दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांनी मात्र घराला कुलूप लावलेले दिसते. गावातील कोणालाच आसिफाचे कुटुंबीय कुठे गेले आहेत याची माहिती नाही. रसाना गावाच्या जंगल परिसरात बरोबर मध्यभागी यांचे एकमेव पक्के घर होते.

पीडितेचे शव दफन करू दिले नाही
पीडितेच्या घरापासून काही किलोमीटवर तिचे काका राहतात. स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार,” रसाना गावात हिंदूंची लोकसंख्या जास्त आहे. आमची देखील तिथे काही जमीन आहे जिथे पाच ते सात कबर आहेत. आम्ही पीडितेला येथेच दफन करण्याचा निर्णय घेतला परंतु त्या गावकऱ्यांनी नकार दिला. त्याचे मत होते की, पीडितेला येथे दफन करू नये. पीडितेच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय खूप घाबरलेले आहेत.”

कदाचित याच भीतीमुळे त्यांनी घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.

संबंधित घडामोडी:

कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी नार्कोसाठी तयार
कठुआ प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल
पुण्यात आसिफाच्या न्यायासाठी कॅण्डल मार्च
कठुआ प्रकरण : वकिलाच्या जीवाला धोका
तर मी जल्लादची नोकरी स्वीकारेन : आनंद महिंद्रा
आसिफाच्या न्यायासाठी रविवारी कोल्हापुरात कॅण्डल मार्च
कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी अखेर चार महिन्यानंतर गुन्हा दाखल