आमिर खानच्या ‘गजनी’ लुकमध्ये दिसला आसिम रियाज, शरीरावर लिहिले ‘Bigg Boss’मध्ये मिळालेले ‘टोमणे’ !

पोलीसनामा ऑनलाईन :टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात कॉन्ट्रोव्हर्शियल शो बिग बॉस 13 चा फर्स्ट रनरअप आसिम रियाज सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये झळकताना दिसत आहे. बिग बॉसनंतर त्याची फॅन फॉलोविंगही वाढली आहे. त्याच्या बिग बॉस न जिंकण्यानं अनेक चाहते नाराज झाले होते. सध्या एका फोटोमुळं आसिम रियाज चर्चेत आला आहे. आसिमचा एक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

बॉलिवूड स्टार आमिर खान याचा गजनी या सिनेमात जसा लुक होता आणि त्याच्या शरीरावर बरंच काही लिहिलं होतं अगदी तशाच लुकमध्ये आसमही दिसत आहे. त्याच्याही शरीरावर बरंच काही लिहिलेलं आहे. आसिमचा हा फोटो त्याच्या चाहत्याकडून शेअर करण्यात आला आहे. असं दिसत आहे की, बिग बॉस न जिंकल्यानं त्यानं अशा प्रकारे नाराजी व्यक्त केली आहे.

फोटोत दिसत आहे की आसिमच्या तोंडावर एक पट्टी आहे. ज्यावर STOP असं लिहिलं आहे. आसिमचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे. ट्विटरवरून शेअर करण्यात आलेला हा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. आसिम रियाजचे अनेक चाहते हे ट्विट लाईक आणि शेअर करताना दिसत आहेत. काही चाहत्यांनी तर यावर कमेंट करत प्रतिक्रियादेखील दिली आहे.