UPSC Result : ASI ची मुलगी झाली IAS अधिकारी, देशात 6 व्या क्रमांकावर येताच वडिलांचं झालं स्वप्न पूर्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तिने एका कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी सोडून तिने जिद्दीने अभ्यास करून ‘आयएएस’ झालीय. तिचे नाव आहे विशाखा यादव. दिल्ली पोलिसातील सहाय्यक सब इन्स्पेक्टर राजकुमार यादव यांच्या कन्या विशाखा यादव हिने जिद्दीने, मेहनतीने अभ्यास करून वडिलांचे स्वप्न साकारात करत ‘आयएएस’अधिकारी झालीय. याबद्दल तिने अभिनंदन करण्यात येत आहे.

विशाखा हिने युपीएससीसारख्या अवघड परीक्षेत उत्तम गुण मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. तिने युपीएससीच्या परीक्षेत 6 व्या क्रमांकावर आलीय. तर, मुलींमध्ये विशाखा दुसरी आलीय. हे समजताच द्वारका जिल्ह्याअंतर्गत दिल्ली पोलिसात कार्यरत असलेल्या सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी राजकुमार यादव यांना शुभेच्छा दिल्यात.

द्वारकाचे डीसीपी आणि अ‍ॅडिशनल डीसीपींसह अन्य जवान आणि कर्मचार्‍यांनी एएसआय राजकुमार यादव यांच्या मुलीच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे.

विशाखा यादव हिने याआधी युपीएससी परीक्षेसाठी दोनदा प्रयत्न केला होता. मात्र, यामध्ये ती प्रवेश प्रक्रिया पास करू शकली नाही. विशाखाने दिल्ली विद्यापीठामधून बी. टेकचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर तिने दोन वर्षे एका कंपनीमध्ये काम केले आहे.

विशाखाचे स्पर्धा परीक्षा हे स्वप्न होते, त्यामुळे तिने मोठ्या पगाराची नोकरी सोडून पुन्हा युपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. तिसर्‍या प्रयत्नात विशाखाला यश मिळाले. विशाखाचे वडील दिल्ली पोलिसात असल्याने अधिकारी होण्याचा आदर्श तिला त्यांच्याकडून मिळाला आहे, असे विशाखाने सांगितले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like