Asish Shelar | सुषमा अंधारे यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे – आशिष शेलार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Asish Shelar) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर टीका करत त्यांना सल्ला दिला आहे. सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे असे करावे, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले आहेत.

स्वत:च्या पक्षाची वाताहात झाल्यानंतर दुसऱ्या पक्षात कलह निर्माण करण्याचे काम सुषमा अंधारे करत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने आम्ही लुटले आणि त्यांना मानवंदना दिली आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या विचारांवर चालणारे आणि त्यांना माननारे लोक आहोत. त्यामुळे मी सुषमा अंधारे यांना हात जोडून विनंती करतो, की त्यांनी दुसऱ्या पक्षात आग लावू नये. गेल्या काही दिवसांपासून त्यांची वक्तव्ये, त्यांची भाषणे, त्यांची कर्तृत्वे संपूर्ण महाराष्ट्र एकतो आणि पहातो आहे. त्यामुळे त्यांनी त्यांचे आडनाव सुषमा अंधारे बदलून सुषमा आगलावे करावे, असे आशिष शेलार (Asish Shelar) म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्यावतीने त्या ठिकाणी गोमूत्राने शुद्धीकरण करण्यात आले होते. यावरुन देखील आशिष शेलार यांनी टोला लावला आहे. एखाद्या स्मृतीस्थळावर जाऊन वंदन करणारी मराठी माणसे ते मंत्री यांच्याबाबत शुद्धीकरण करण्याचा अशुद्ध विचार आपल्या मनात का आला, हा प्रश्न आहे, असे आशिष शेलार म्हणाले.

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्या शिंदे गट आणि भाजप नेत्यांचा कसून समाचार घेत आहेत.
त्यांची भाषणे मुद्देसूद आणि रोखठोक असल्याने ती प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या भाषणांना गर्दी वाढत आहे.
त्यांनी मागील काही काळ संजय राऊत (Sanjay Raut) यांची जागा भरुन काढल्याची भावना शिवसेनेच्या
आणि जनसामान्यांच्या मनात होती. त्यामुळे त्या काही थोडया काळातच लोकप्रिय झाल्या आहेत.
त्यामुळे भाजपने सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष दिले नसले, तरी त्यांना आता सुषमा अंधारे यांची दखल घ्यावी लागली आहे.

Web Title :- Asish Shelar | bjp ashish shelar slams shivsena sushma andhare over her statement

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sanjay Raut On CM Eknath Shinde | “…ढोंगी लोक बाळासाहेबांचे वारसदार होऊ पाहत आहेत”; संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

Narayan Rane | न्यायालयाच्या आदेशानंतर नारायण राणे यांच्या ‘अधीश’ बंगल्यावर हातोडा

Nana Patole | ‘राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे देशात परिवर्तनाची लाट’ – नाना पटोले