ऑनलाइन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी IRCTC चं मोठं गिफ्ट ! 24 तास ‘एकदम’ फ्री मिळणार ‘ही’ सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC ने ग्राहकांच्या सुविधांसाठी आपल्या वेबसाईटवर आर्टिफिशियल इंटेलिजेंसने चॅटबोट फिचर ‘Ask Disha’ सादर केले आहे. IRCTC च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने तिकीट बुक करणाऱ्यांसाठी हे महत्वाचे फिचर आहे. IRCTC ने ट्विट करत सांगितले की, हे ग्राहकांसाठी चोवीस तास सेवा देईल. यामुळे युजर आपल्या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे सहज मिळवू शकतात.

Ask Disha फीचरची वैशिष्ट्य आयआरसीटीसी वेबसाइटच्या उजव्या बाजूला दिली गेली आहेत. हे लोकांना तिकिट बुकिंग, तिकिट रद्द करणे, तत्काळ तिकिट बुकिंग आणि इतर गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती देईल. हे डिजिटल परस्परसंवादाचे एक माध्यम आहे जे वापरकर्त्यांना कोणत्याही वेळी मदत करेल.

IRCTC नुसार या यंत्रणेद्वारे प्रवासी कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि त्यांना आपल्या प्रश्नाची उत्तरे देखील अगदी सहजतेने मिळू शकतात.

कसे काम करते Ask Disha
उदा – तुम्ही Ask Disha ला विचारता की इ तिकीट कसे रद्द करायचे आणि रिफंड कसा मिळवायचा यानंतर Ask Disha तुम्हाला पूर्ण माहिती देईल. विशेष म्हणजे यामध्ये युजर हिंदी आणि इंग्रजी अशा दोनीही भाषांमध्ये प्रश्न विचारू शकतात.

फेसबुक पेज लाईक करा