शिस्त पाळायला सांगितले की मला ‘हुकूमशहा’ ठरवले जाते

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

व्यवस्थेमध्ये शिस्तीला प्राधान्य हवे पण, त्याबद्दल बोलायला गेलं की लोकं मला ‘हुकूमशहा’ ठरवतात अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली.
[amazon_link asins=’B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d139e67-aea7-11e8-8fd2-e3f95af83d47′]

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ‘मुव्हिंग ऑन मुव्हिंग फॉर्वर्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, व्यंकय्याजी शिस्तीच्या बाबतीत खूपच आग्रही आहेत. परंतु सध्या शिस्तीला लोकशाहीविरोधी ठरवले जात आहे. जरा जरी कोणी शिस्तीचा आग्रह धरला की त्याला हुकूमशहा ठरवले जाते. ध्येयपूर्तीसाठी नियमबद्ध कार्यप्रणाली अनिवार्य असून व्यवस्था आणि व्यक्ती अशा दोघांसाठी हा गुण लाभदायी ठरतो.

आपल्या देशातील खेडी, शेती या विषयीचे चिंतन नायडू यांच्या मनात घोळत असते. वाजपेयी सरकारमध्ये ग्रामीण विकास मंत्रालय आपल्याला मिळावे अशी इच्छा नायडू यांनी व्यक्त केली होती आणि ते खातं मिळाल्यावर शहरे आणि गावं यांना जोडणारी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना त्यांनी तयार केली असे मोदी यांनी यावेळी बोलताना सांगितले.
[amazon_link asins=’B01FM7GGFI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a2ac6b05-aea7-11e8-a7eb-77e66682fb81′]

या पुस्तक प्रकाशन प्रसंगी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग उपस्थित होते. नायडू यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या एक वर्षाच्या कामातून राजकीय आणि प्रशासकीय अनुभवाची झलक दिसून येते असे सिंग यावेळी बोलताना म्हणाले.

सरकारने शेतीकडे पक्षपातीपणे पाहू नये. अन्यथा यात फायदा नसल्याने लोकं अन्य क्षेत्रांकडे वळतील आणि गंभीर समस्या निर्माण होतील असे यावेळी नायडू म्हणाले.

दि.13 जानेवारी ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधित 28 लाख 50 हजाराची व्हीव्हरशिप मिळवलेल्या व 15 हजार Subscribes असलेल्या Policenama News या चॅनेला Subscribe करा.

Policenama News