अार.पी.अाय (आठवले गट) च्या शहर अध्यक्ष पदी अशाेक कांबळे

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

रिपब्लिन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं आठवले गट) च्या शहर अध्यक्ष पदाच्या निवडणुकी मध्ये विश्रांतवाडी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक कांबळे यांनी बाजी मारली. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार होते. पुढील १५ दिवसांत नवीन कार्यकारिणी नियुक्त करावी, असे आदेश नवनियुक्त अध्यक्षांना देण्यात आल्याचे, पक्षाचे कोषाध्यक्ष आणि निवडणूक निर्णय अधिकारी एम.डी. शेवाळे यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B07B6SN496′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4c3572bd-8355-11e8-891f-497a7200c7ff’]

रिपाइं ने प्रथमच क्रियाशील सदस्यांच्या मतदानातून शहर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविली होती. नाना पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळेत काल मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया राबविली गेली. या निवडणुकीमध्ये ११ उमेदवार सहभागी झाले होते. सुमारे दोन हजार ९०० क्रियाशील सदस्यांनी मतदान केले. रात्री साडेबारा वाजता मतमोजणी पूर्ण झाली. त्यामध्ये अशोक कांबळे सर्वाधिक मतांनी विजयी झाले. येत्या १५ दिवसांत त्यांनी नवीन शहर कार्यकारिणी स्थापन करावी असे आदेश दिले आहेत, असे रिपाइं चे कोषाध्यक्ष एम.डी. शेवाळे यांनी सांगितले.