अहमदनगर : कत्तलीसाठी आणलेली जनावरे पकडली, विविध ठिकाणी पोलिसांचे छापे

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – बकरी ईद सणानिमित्त शहरात कत्तलीसाठी आणलेली ४१ गोवंशीय जनावरे पकडून पोलिसांनी त्यांची रवानगी गोशाळेत केली आहे. शहरातील विविध ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

आज पोलिस उपअधीक्षक संदिप मिटके यांना मिळालेल्या माहितीवरून स.पो.नि. प्रविण पाटील यांच्या पथकाने मुकुंदनगर परिसरात सी.आय.व्ही. कॉलनी मागे, शरद मुथ्था यांचे शेतात व नागरदेवळे येथे हॉटेल प्रितम मागे, बाबा शेख यांचे शेतात छापा टाकला असता सदर दोन्ही ठिकाणी काही इसम गोवंश जनावरे बांधलेले असल्या ठिकाणी दिसल्याने ते पथकातील कर्मचाऱ्यांना पाहून पळू लागले. त्यांचा पाठलाग केला असता ते मिळून आले नाहीत. पळून गेलेले इसम व जनावरांचे मालकीबाबत आजुबाजूस राहणारे लोकांकडे विचारपस केली असता मुंकूदनगर परिसरात सी.आय.व्ही. कॉलनी येथे टाकलेल्या छाप्यातील आरोपींचे नावे वसीम मल्ला, सादिक अल्लाबक्ष, अल्कमश चाँद शेख (सर्व रा. मुकुंदनगर, अहमदनगर) असे सांगितले. तसेच नागरदेवळे येथे हॉटेल प्रितम येथे टाकलेल्या छाप्यातील आरोपींचे नाव इल्लुभाई कुरेशी (रा. नागरदेवळे, भिंगार) असे सांगितले.

सी.आय.व्ही. कॉलनी मागे, शरद मुथ्था यांचे शेतात या ठिकाणाहून २ लाख ६० हजार रुपयांची गोवंश जातीची जनावरे व नागरदेवळे येथे हॉटेल प्रितम मागे, बाबा शेख यांचे शेतात या ठिकाणाहून २८,०००/- रु. किमतीची ११ गोवंश जातीची जनावरे असे एकूण ११०००/- सिटी गोवंश जातीची जनावरे बांधलेली मिळून आली. सदर जनावरांची सुटका करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like