ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

नवी दिल्ली : ब्लॅक आणि व्हाईट फंगसनंतर आता कोविड-19 मधून बरे झाल्यानंतर लक्षणांमध्ये एक नवीन फंगस समोर आला आहे. गुजरातच्या वडोदरा जिल्ह्यात अ‍ॅस्परगिलोसिस (aspergillosis) म्हणून ओळखला जाणारा नवीन फंगस (aspergillosis) आढळून आला आहे. 27 मे रोजी संसर्गाची एकुण 8 प्रकरणे समोर आली.

अ‍ॅस्परगिलोसिस काय आहे?
अ‍ॅस्परगिलोसिस एक संसर्ग, अ‍ॅलर्जीची रिअ‍ॅक्शन, किंवा अ‍ॅस्परगिलस फंगसमुळे होणारी फंगल ग्रोथ आहे, जे सामान्यपणे मृत पाने आणि सडणार्‍या वनस्तींवर वाढते. मात्र, आपण जवळपास रोजच फंगसशी सामना करतो, आजाराशी कॉन्टॅक्ट करणे खुप सामान्य नाही. यामुळे कमजोर इम्यून सिस्टम किंवा फुफ्फुसांच्या आजारांच्या लोकांना संक्रमित करण्याची जास्त शक्यता असते.

 

अ‍ॅस्परगिलोसिसचे टाईप्स आणि लक्षणे –

1. अ‍ॅलर्जी ब्रोंकोपुलमोनरी अ‍ॅस्परगिलोसिस (एबीपीए) : श्वास घेण्यास त्रास, खोकला, ताप, घरघर

2. अ‍ॅलर्जिक अ‍ॅस्परगिलस सायनसायटिस : वाहणारे नाक, वास घेण्याची क्षमता कमी होणे, जडपणा, डोकेदुखी

3. अ‍ॅस्परगिलोमा : श्वास घेण्यास त्रास, खोकला, खोकल्यातून रक्त येणे

4. क्रोनिक पल्मोनरी अ‍ॅस्परगिलोसिस : थकवा, वजन कमी होणे, श्वास घेण्यास त्रास, खोकल्यातून रक्त

5. इनव्हेसिव्ह अ‍ॅस्परगिलोसिस : हे समाान्यपणे त्या लोकांना होते जे अगोदरपासून कोविड-19 सारख्या दुसर्‍या मेडिकल कंडीशन्सने आजारी आहेत. याच्या लक्षणांमध्ये ताप, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, खोकला आणि खोकल्यातून रक्त येणे याचा समावेश आहे. मात्र, दूसरी लक्षणे विकसित होऊ शकता जर संसर्ग फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागात पसरला.

अ‍ॅस्परगिलोसिस कसा होतो ?
कोविड-19 रूग्णांमध्ये अनेक फंगल संसर्गाच्या कारणांपैकी एक स्टेरॉईडचा वापर आणि कमी इम्यूनिटी आहे. दूसरे एक कंट्रीब्यूटिंग फॅक्टर ऑक्सीजनचा सप्लाय हायड्रेट करण्यासाठी वापरले जाणारे नॉन-स्टेराईल पाणी असू शकते.

अशी घ्या काळजी
* खुप जास्त उन्हात जाऊ नका
* अशा अ‍ॅक्टिव्हिटी टाळा ज्यामध्ये माती, धुळीच्या संपर्कात येऊ शकता.
* गंभीर अ‍ॅस्परगिलोसिस (अवयव प्रत्यारोपण किंवा स्टेम सेल प्रत्यारोपणामुळे) डेव्हलप होण्याची हाय रिस्क असेल तर डॉक्टर संसर्ग रोखण्यासाठी औषध लिहून देऊ शकता.
* ब्लड टेस्टद्वारे संसर्गाचे लवकर निदान केल्यास फायदा होता.

उपचार
अ‍ॅस्परगिलोसिसचा उपचार सामान्यपणे वोरिकोनाजोलने केला जातो. मीडिया रिपोर्टनुसार, अलिकडेच डॉक्टर एक अँटीफंगल औषध – इसावुकोनजोल द्वारे रूग्णांवर उपचार करत आहेत. उपचारने जर इन्फेक्शन बरे झाले नाही तर एक्सपर्टच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असते, ज्यमध्ये अँटिफंगल-प्रतिरोधी संसर्गसुद्धा सहभागी आहे.

 

Also Read This : 

 

Pune : पुण्याच्या भोर तालुक्यातील दुमजली फार्महाऊसमध्ये ‘डान्सबार’ ! 13 जणांना पकडलं, पुण्यातील ‘शोकीन’ मंडळींचा सहभाग; प्रचंड खळबळ

 

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

 

 Maratha Reservation : ‘खासदार संभाजीराजेंनी मांडलेली भूमिका मराठा समाजाच्या हिताची, पण…’

 

लठ्ठपणाबरोबरच तुम्हाला या समस्यांपासूनही आराम मिळेल, दररोज गरम पाणी प्या पण योग्य मार्ग जाणून घ्या

 

इंधन दरवाढीचा पुन्हा भडका ! मुंबईत पेट्रोल 100 पार

 

 

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा