Aspergillus | रिकव्हर झालेल्या कोरोना रूग्णांच्या ‘ब्रेन’मध्ये आढळली भयानक ‘व्हाईट फंगस’ची गाठ, शास्त्रज्ञ झाले हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aspergillus | कोरोना व्हायरस महामारी (Coronavirus Pandemic) ची तिसरी लाट लवकरच सुरू होण्याची चर्चा सुरू असताना हैद्राबाद (Hyderabad) मधून एक असे प्रकरण समोर आले आहे, ज्याने सर्वांची चिंता वाढवली आहे. येथे कोरोनातून रिकव्हर झालेल्या एका रूग्णाच्या ब्रेनमध्ये दुर्मिळ व्हाईट फंगसची गाठ म्हणजे एस्परगिलस (Aspergillus) आढळले आहे.

रूग्णाच्या मेंदूत तयार झाली गाठ

abscess formed in the patient's brainहैद्राबादच्या सनशाईन हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. पी. रंगनाथम यांनी सांगितले की, हा रूग्ण मागील मे महिनयात कोरोना संक्रमित झाला होता. आजारात त्याच्या फुफ्फुसात गंभीर संसर्ग झाला होता, आणि त्यास बोलतानाही त्रास होत होता.

सर्जरी करून डॉक्टरांनी वाचवले प्राण

Doctor saved life by doing surgeryयानंतर त्याचे बॉडी स्कॅन करण्यात आले, ज्यामध्ये समजले की, रूग्णाच्या ब्रेनमध्ये क्लॉटसारखी संरचना तयार होत आहे. सतत उपचार करूनही क्लॉट बरा झाला नाही. यासाठी सर्जरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा समले की, व्हाईट फंगसने गाठ बनवली आहे जो अतिशय दुर्मिळ आजार आहे.

 

शुगर पेशंटला सर्वात जास्त धोका

Sugar patients most at riskमीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टर रंगनाथम यांनी सांगितले की, अशी केस खुप रेयर असते. भारतात अशी प्रकरणे सहसा आढळत नाहीत. ही एक यूनीक केस आहे. सामान्यपणे फंगल इन्फेक्शन शुगरचे रुग्ण किंवा खराब इम्यून सिस्टमच्या रूग्णांमध्ये लवकर होते. परंतु 60 वर्षांच्या या रूग्णाला डायबिटीजची समस्या सुद्धा नाही. यासाठी चिंता वाढली आहे.

चिंतेचा विषय असल्याचं वैज्ञानिकांनी सांगितलं

Scientist said - this is a matter of concernभारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर ब्लॅक फंगसच्या केस अचानक वाढल्या होत्या. विशेषता महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या रूग्णांच्या संख्येत जास्त वाढ झाली होती. मात्र, यानंतर व्हायरसचे अनेक व्हेरिएंट सुद्धा समोर आले. परंतु आता रुग्णाच्या मेंदूत व्हाईट फंगसच्या गाठीचा प्रकार समोर आल्याने शास्त्रज्ञ सुद्धा हैराणे आहेत.

धोका अजूनही कायम

Covid19 danger still persistsडॉक्टरांचे म्हणणे आहे की जस-जसा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा परिणाम कमी झाला,
तस-तशी ब्लॅक फंगस आणि नंतर व्हाईट फंगसची प्रकरणे सुद्धा कमी होत गेली,
परंतु धोका अजूनही टळलेला नाही. कोरोना नव-नवीन पद्धतीने लोकांना प्रभावित करत आहे.
यासाठी कोरोना प्रोटोकॉलचे सक्तीने पालन करत राहावे.

Web Title :-  Aspergillus | hyderabad rare white fungus abscess detected in brain of 60 years old corona recovered patient

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | शिक्षकेच्या पती अन् त्याच्या मैत्रिणीकडून फेसबुकवर अश्लील व घाणेरडया पोस्ट, महिलेनं उचललं मोठं पाऊल

Sawan Somvar | महादेवाची पूजा करण्यासाठी बेलाच्या पानाचं महत्व काय? जाणून घ्या महत्व 

Pune News | सक्सेस स्क्वेअर सोसायटीची मुख्यमंंत्री सहायता निधीस देणगी