धक्कादायक ! अल्पवयीन मुलीचे अपहरण करून ३ दिवस सामुहिक अत्याचार

करीमगंज (आसाम) : वृत्तसंस्था – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर तीन दिवस सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर टाऊन कमिटीच्या इमारतीमध्ये उघडकीस आला. पीडित १५ वर्षीय मुलीवर रुग्णालयात उपचार सरु आहेत. पीडित मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बदरपूर टाऊन कमिटीच्या इमारतीमधून स्थानिक नागरिकांनी पीडित मुलीला ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार समोर आला.

पीडित मुलीच्या कुटुंबाच्या म्हणण्यानुसार, एका युवकाने घराजवळून तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिला सिलचर येथे नेऊन आरोपी आणि त्याच्या मित्रांनी मुलीवर लैंगिक अत्याचार करून शुक्रवारी संध्याकाळी तिला सोडून देण्यात आले. याप्रकरणी करीमगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलीस अधीक्षक मनभेंदर देबरॉय म्हणाले, पीडित मुलगी गंभीर स्थितीमध्ये आढळून आली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर आहे. आशा आहे पीडित मुलगी लवकर बरी होईल. मुलीने दिलेल्या जबाबानुसार पोलिसांना आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच जेरबंद करण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –