सुविधा नसल्यामुळे रस्त्यातच महिलेची झाली प्रसूती (व्हिडीओ)

नवी दिल्ली वृत्तसंस्था – आजपर्यंत आपण राज्यासह देशात रुग्णवाहिका नसल्यास कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह खांद्यांवर आणि सायकलवरून नेला असल्याचे ऐकले आहे. पण आसाममधील एका गावात असे प्रकरण समोर आले आहे की स्ट्रेचर न मिळाल्यामुळे हे कुटुंब 5 किमी प्लास्टिकच्या ताडपत्रीने बनवलेल्या स्ट्रेचरवरून महिलेला प्रसूतीसाठी घेऊन गेले आणि मध्येच महिलेने मुलाला जन्म दिला.

आसाममध्ये सध्या राजकीय गडबड सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की परप्रांतीयांना येथे राहू दिले जाणार नाही. याचा परिणाम म्हणून येथील मूळ रहिवाशांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवले जात आहे. एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यात प्रसूतीला  वेळेवर रुग्णालयात पोहचवण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र महिला प्लास्टिक ताडपत्रीतच्या  स्ट्रेचरमध्ये मुलास जन्म दिते. एवढेच नव्हे तर तशाच अवस्थेत दोन जणांनी प्रसूती झालेल्या महिलेला खांद्यावर ठेवले आणि पाच किलोमीटर चालून रुग्णालयात दाखल केले.

आरोग्यविषयक वृत्त