Photos : ‘या’ नववधूचे फोटो होतायेत देशभरात ‘व्हायरल’, ‘मास्क’ बनलं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आसामच्या वधूचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोक फोटो पाहून वधू-वरांचे कौतुक करीत आहेत. या जोडप्याचे फोटो अशाप्रकारे व्हायरल होण्याचे कारणदेखील खूप खास आहे, ज्यामुळे आपण त्यांचे कौतुक कराल यात शंकाच नाही.

कोविड -19 मुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये सूट दिल्यामुळे लोक न्यू नॉर्मलच्या दिशेने जात आहेत. या न्यू नॉर्मलमध्ये सॅनिटायझरपासून मास्क आणि सामाजिक अंतरापर्यत सामिल आहे. अगदी विवाहसोहळ्यातही लोक त्याचे अनुसरण करताना दिसतात.

आसाममधील एका लग्नातही वधू-वरांना त्यांच्यासाठी जसे कपडे शिवून घेतले आहे तसेच खास मास्कही तयार करुन घेतले आहे, जे त्यांच्या कपड्यांशी मॅच होत आहे. लग्नात वधू-वरांनी पारंपारिक पांढरा कुर्ता-धोती आणि आसाम रेशीमची साडी परिधान केली आहे.

मास्कबद्दल बोलायचे म्हणले तर वराने सिंपल मास्क आणि गोल्डन कलरची टोपी परिधान केली आहे. त्याचबरोबर, वधूने परिधान केलेल्या मास्कवर अधिक डिझाईन केलेली दिसत आहे. मास्क अधिक खास बनविण्यासाठी टॅसल देखील बसविण्यात आले आहे. वधूने मेकअप करुन चेहऱ्याला मास्क लावला आहे. लूक परफेक्ट बनवण्यासाठी वधूने रेशीम साडीसह हलके वजनाच्या सोन्याचे दागिने परिधान केले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like