आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर ‘हल्ला’, नागरिकत्व विधेयकाला विरोध, केंद्रीय मंत्र्याच्या घराची ‘नासधुस’

गोहाटी : वृत्त – नागरिकत्व संशोधन विधेयकाला संसदेने मंजुरी दिली असतानाच त्याच्याविरोधात ईशान्य भारतात उग्र आंदोलन सुरु झाले आहे. अनेक ठिकाणी लष्काराला पाचारण करण्यात आले आहे. आंदोलनकर्त्यांनी आसामचे मुख्यमंत्री सोनोवाल यांच्या डिब्रुगड येथील घरावर हल्ला करुन जोरदार दगडफेक केली. तसेच केंद्रीय मंत्री रामेश्वर तेली यांच्या दुलियाजन येथील घरावर हल्ला करुन सामानाची नासधुस केली.

आसाममध्ये गोहाटी आणि जोरहाट येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. गोहाटीमध्ये लष्कराच्या दोन तुकड्यांनी फ्लॅग मार्च करत आहेत. तिनसुकिया जिल्ह्यातही लष्कर पाठविण्यात आले आहे. आसाम राईफ्ल्स च्या जवान त्रिपुरामध्ये दाखल झाले आहेत.

गोहाटी आणि डिब्रुगड येथे संचारबंदी जारी केली असली तरी अनेक ठिकाणी आंदोलकांनी ती झुगारुन देत जाळपोळ करीत रस्ते अडवून धरले आहेत. आसाममधील १० जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सोशल मिडियाचा दुरुपयोग टाकण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी इंटरनेट बंद केले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्रिपुरामध्ये बुधवारी दुसऱ्या दिवशी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती. गुरुवारीही ती बंद राहणार आहे.

गोहाटीमधील संचारबंदी अनिश्चित काळासाठी लागू करण्यात आली असून त्यामुळे गोहाटीला येणाऱ्या बसगाड्या, रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. त्या अनेक ठिकाणी थांबून ठेवण्यात आल्या आहेत किंवा वाटेतूनच रद्द केल्या गेल्या आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like