सहाय्यक प्राध्यापकाने रेकॉर्ड केला महिलेचा ‘अश्लील’ व्हिडिओ, अपलोडच्या आरोपामध्ये अटक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – अश्लील व्हिडिओ बनवून इंटरनेटवर पोस्ट केल्याच्या आरोपाखाली आसामच्या दिब्रुगड विद्यापीठाच्या सहाय्यक प्राध्यापकास शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, डिब्रूगड, श्रीजित टी यांनी पीटीआयला सांगितले की, विद्यापीठाचे कुलसचिव यांनी दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे गणिताचे सहाय्यक प्राध्यापक यांना अटक केली आहे. एफआयआरमध्ये असा आरोप केला गेला आहे की, सहाय्यक प्राध्यापकाने अश्लील वेबसाइटवर व्हिडिओ अपलोड केला होता.

ते म्हणाले की, “इंटरनेटवरील व्हायरल व्हिडिओमध्ये सहाय्यक प्राध्यापकासारखा दिसणारा एक माणूस एका महिलेसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसत आहे. आम्ही गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या घरी छापा टाकला आणि त्यांचा लॅपटॉप ताब्यात घेतला,”

एसपी म्हणाले की, “चौकशीत सहाय्यक प्राध्यापकाने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांनी तीन वर्षांपूर्वी गुवाहाटी येथील हॉटेलमध्ये त्या महिलेसोबत व्हिडिओ बनविला होता.” ते म्हणाले की, रेकॉर्डिंगमध्ये वापरलेला कॅमेराही ताब्यात घेण्यात आला आहे.

एसपीच्या म्हणण्यानुसार, सहाय्यक प्राध्यापकाने असा दावा केला आहे की, व्हिडिओमध्ये दिसणारी महिला विद्यापीठातील विद्यार्थी नव्हती. एसपी पुढे म्हणाले की, सहाय्यक प्राध्यापकावर भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.