Teacher Recruitment 2021; ‘इथं’ निघाली सरकारी पदावर शिक्षक भरती, 60500 रुपयांपर्यंत पगार, ‘असा’ करा अर्ज

पोलिसनामा ऑनलाईन – Secondary Education Assam Gratuate Teacher Recruitment 2021, DSE आसाम भरती 2021: शिक्षक भरतीसाठी वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुश खबर आहे. माध्यमिक शिक्षा संचनालय, आसाम ने अनेक पदांसाठी शिक्षक भरतीसाठी अर्ज मागवली आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत पात्र आणि इछयुक उमेदवार खाली दिलेल्या संकेतस्थळाच्या लिंकवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2021 आहे. या रिक्त जागेत पदवीधर शिक्षक (संस्कृत) च्या 241 जागांसाठी उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे.

महत्वाच्या तारखा…
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 28 फेब्रुवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021

पात्रता आणि निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून कला व संस्कृत भाषेत 50% गुणांसह पदवीधर असणे आवश्यक आहे अथवा पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे. शैक्षणिक कामगिरी आणि गुणवत्तेच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल.

वेतन
DSE आसाम पदवीधर शिक्षक भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 14000 ते 60500 रुपये दरमहा वेतन मिळेल. या पदाचा ग्रेड वेतन दरमहा 8700 रुपये असेल. यासोबत काही इतर भत्तेही मिळतील.

वयोमर्यादा
18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार DSE आसाम भरती 2021 साठी अर्ज करू शकतात. 01 जानेवारी 2021 पर्यंत वयाच्या आधारावर वय मोजले जाईल. या भरती प्रक्रियेसाठी कोणताही अर्ज फी आकारली जाणार नाही.