विकृतीचा कळस ! ‘दफन’ केलेल्या युवतीचा मृतदेह बाहेर काढून ‘संबंध’ ठेवण्याचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन – दफन केलेला मुलीचा मृतदेह बाहेर काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न एका विकृताने केला. आसामच्या धेमाजी जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल अशी धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या 50 वर्षीय विकृताला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी या मुलीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी नदीकाठी तिच्या मृतदेहाचे दफन केले होते.

आसामच्या धेमाजी जिल्ह्यातंर्गत येणार्‍या सीलापाथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. मागच्या आठवडयात 17 मे रोजी रात्री या मुलीचे निधन झाल्यानंतर धेमगावात नदीकाठी कुटुंबीयांनी तिच्या मृतदेहाने दफन केले. 18 मे रोजी दुपारी विकृताने नदीकाठी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी तिथे असलेल्या स्थानिक मच्छीमारांनी त्याला पाहिले. त्यांनी या विकृताला पकडले व पोलिसांच्या स्वाधीन केले. शरीरसंबंध ठेवण्यासाठी आपण दफन केलेला मृतदेह बाहेर काढल्याचे त्याने कबूल केले. आसाम पोलिसांनी आरोपीविरोधात कलम 306, 377 आणि पॉस्को कायद्याच्या कलम आठ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे कोर्टाच्या निर्देशावरुन आरोपीची अलीकडेच तुरुंगातून सुटका झाली होती. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे आरोपी तुरुंगातून सुटला होता अशी माहिती पोलिसांनी दिली.

You might also like