Assam-Mizoram Border Clash | मूळच्या पुण्याच्या IPS ऑफिसरची मृत्यूशी यशस्वी झुंज’, सीमा संघर्षात लागल्या होत्या गोळ्या

गुवाहाटी : वृत्तसंस्था आसाम-मिझोराम सीमेवर 26 जुलैला झालेल्या हिंसाचारात (Assam-Mizoram Border Clash) आसाम पोलीस दलाचे 6 जवान मृत्यूमुखी पडले होते. तर 45 हून अधिक जण जखमी झाले होते. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली होती. काछरचे पोलीस अधिक्षक वैभव चंद्रकांत निंबाळकर (Cachar Superintendent of Police Vaibhav Chandrakant Nimbalkar) यांना हिंसाचारात (Assam-Mizoram Border Clash) गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली आहे.

वैभव निंबाळकर यांच्या पत्नी अनुजा निंबाळकर (Anuja Nimbalkar) यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.
फोटोमध्ये वैभव निंबाळक हे हॉस्पिटलमध्ये वॉकर घेऊन चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रातील जनतेत आनंद व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्राच्या या वीराने गोळ्या झेलून मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा स्वत:च्या पायावर उभा राहिल्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
याबाबत एका वृत्तवाहीनीने वृत्त दिले आहे.

पोलीस अधीक्षक वैभव निंबाळकर हे सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात (Kokilaben Ambani Hospital Mumbai) उपचार घेत आहेत.
डॉक्टरांनीही निंबाळकर यांच्या प्रकृतीतील या सुधारणेबाबत समाधान व्यक्त केलं असून त्यांच्या प्रकृतीत वेगानं सुधारणा होत असल्याचं म्हटले आहे.
वैभव निंबाळकर हे मुळचे पुणे जिल्ह्यातील (Pune district) इंदापूरचे (Indapur) रहिवासी आहेत.
ते 2009 च्या IPS बॅचचे अधिकारी असून, भारतीय पोलीस सेवेत निवड झालेले ते सर्वात तरुण अधिकारी आहेत. आसाम केडर प्राप्त झाल्यापासून ते आसाममध्ये कार्यरत आहेत.

 

आसाम-मिझोराम यांच्यातील सीमावादावरुन चकमक उडाली होती.
यामध्ये निंबाळकर यांना गोळी लागली होती. त्यांच्या ओटीपोटात आणि मांडीच्या हाडाला गोळी लागली होती. त्यामुळे अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं होतं.
गंभीर जखमी अवस्थेत त्यांना आधी सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (Silchar Medical College and Hospital) दाखल करण्यात आलं होतं.
सिलचर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हेलिकॉप्टर अ‍ॅम्बुलन्सच्या (Helicopter ambulance) सहाय्याने मुंबईला आणण्यात आले.
याठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
17-18 दिवस उपचार केल्यानंतर त्यांच्या जखमा बऱ्या होत असून ते हळूहळू फिरू लागले आहेत.

 

Web Title : Assam-Mizoram Border Clash | pune ips officer in assam vaibhav nimbalkar recuperates in mumbai injured in assam mizoram border dispute

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

UBI Recruitment 2021 | उमेदवारांना बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विविध जागांसाठी भरती

Crime News | धक्कादायक ! विवाहानंतर 2 महिन्यातच पत्नीचा मृत्यू तर पतीने स्मशानातच घेतला गळफास

Police Suspended | आरोपीला मदत करणे पडले महागात, पोलिसाचे तडकाफडकी निलंबन; जाणून घ्या प्रकरण