Assam-Mizoram Border Conflict | आसाम-मिझोराम सीमा संघर्षाला हिंसक वळण; गोळीबारात आसामचे 6 पोलीस मृत्युमुखी तर SP वैभव निंबाळकर जखमी

गुवाहाटी : आसाम आणि मिझोराममधील सीमावादाला (Assam-Mizoram Border Conflict) हिंसक वळण लागले असून सीमेवर झालेल्या गोळीबारात आसामच्या 6 पोलिसांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे हा वाद (Assam-Mizoram Border Conflict) आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी ट्विटरवरून दिली.

दरम्यान, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले असून गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी दोन्ही बाजूकडून करण्यात आली आहे.

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा (Assam CM Himanta Biswa Sarma) यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आसाम-मिझोरामच्या सीमेवर आपल्या सीमेचे रक्षण करत असताना आसाम पोलीस दलाचे 6 शूर पोलीस शहीद (6 brave police martyrs) झाले आहेत, हे सांगताना मला अतिशय दु:ख होत आहे. माझ्या सहवेदना त्यांच्या संतप्त कुटुंबियांसोबत आहेत.

गोळीबारात आसामचे 6 जवान शहीद झाल्यानंतर दोन्ही राज्यांच्या सीमेवरील तणाव आणखी वाढला आहे.
हा सीमा प्रश्न आणखी हिंसक होण्याची भिती वर्तवली जात आहे.
दरम्यान, मिझोरमकडून झालेल्या गोळीबारात काचर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निंबाळकर वैभव चंद्रकांत हे जखमी झाले आहेत
(Assam’s Cachar district SP Nimbalkar Vaibhav Chandrakant injured in firing by assailants from Mizoram).

Web Title :- Assam-Mizoram Border Conflict | Violent turn to Assam-Mizoram border conflict; Six Assam policemen were killed and SP Vaibhav Nimbalkar was injured in the firing

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Anti-Corruption | पोलिस उपनिरीक्षक 80 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

Nashik Crime | दोघा भावांवर सपासप वार करत जीवघेणा हल्ला; नाशिक शहरातील खळबळजनक घटना, Video व्हायरल

Pune Crime | 58 गुंठे जमीन बळकवण्यासाठी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याच्या धमकीच्या गुन्ह्यातील संशयित नितीन हमनेचा जामीन मंजूर