Coronavirus : परदेशात अडकलेल्या भारतीयांना ‘हे’ सरकार दीड लाख रूपयाची मदत करणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – विदेशात अडकलेल्या आसामच्या लोकांसाठी खुशखबर आहे. सरकारने निर्णय घेतला आहे की तेथील जे कोणी लोक कोरोना व्हायरसमुळे विदेशात अडकून पडले आहेत त्यांना 2 हजार डॉलर म्हणजे जवळपास 1.5 लाख रुपयांची सहायता केली जाणार आहे. ही मदत फक्त त्या लोकांना दिली जाईल जे मागील एक महिन्यापासून विदेशात अडकले आहेत. ही मदत विद्यार्थी आणि नोकरी करणाऱ्या अशा दोन्ही लोकांना दिली जाणार आहेत. आसाम राज्याचे आरोग्य मंत्री हेंमत बिश्व सरमा यांनी याची घोषणा केली आहे.

ही असणार अट –
आसामच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितले, आम्ही आपल्या राज्यातील निवासितांना 2,000 डॉलर ट्रांसफर करण्याचा निर्णय घेतला आहे जे एक महिन्यांपासून विदेशात अडकले आहेत आणि कोरोनामुळे परत भारतात परतण्यास असमर्थ आहेत. मंत्र्यांच्या मते, याबाबतची माहिती लवकरच ई-मेलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवली जाईल. त्यांनी ही देखील माहिती दिली की 31 मार्चपर्यंत सर्व सरकारी ऑफिसमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांना येण्यास सांगण्यात आले आहे. बाकी कर्मचारी घरुन काम करतील. परंतु आरोग्य, अग्निशमन सेवा, वीज, पाणीपुरवठा आणि आवश्यक सेवा पुरवणाऱ्या विभागाशी संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणे आवश्यक आहे.

अद्याप एकही पॉझिटिव्ह केस नाही –
आसाममध्ये आतापर्यंत 57 लोकांची चाचणी केली गेली आहे आणि सर्वांचे रिपोर्ट नेगेटिव्ह आले आहेत. शुक्रवारी 1003 लोकांना घरी क्वारेंटाइन करण्यात आले, तर 41 लोकांना रुग्णालयात वेगळ्या वार्डमध्ये ठेवण्यात आले. याशिवाय 31 मार्च पर्यंत सर्व शिक्षण संस्थांना सुट्ट्या देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच परिक्षा स्थगित करण्याचे देखील आदेश देण्यात आले. स्विमिंग पूल, सलून, कोचिंग सेंटर यापूर्वी बंद करण्यात आले आहेत.

निवडणूकांना स्थगिती –
कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे बोडोलॅंड क्षेत्रीय परिषद (बीटीसी) च्या निवडणूका स्थगित करण्यात आल्या आहेत. बीटीसीच्या 40 क्षेत्रात 4 एप्रिलला निवडणूका पार पडणार होत्या आणि आता या निवडणूका एप्रिलच्या अखेरच्या महिन्यात होण्याची शक्यता आहे.