धक्‍कादायक ! पत्ते खेळताना बोलवायला आल्याने पत्नीची हत्या

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – पत्ते खेळताना बोलविल्याच्या रागातून एकाने आपल्या पत्नीला मारहाण करुन तिची हत्या केली. उसरघर गावात ही घटना घडली असून पोलिसांनी बालाराम रामा दिवे (वय ३५) याला अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, उसरघर गाव येथे राहणाऱ्या चिंतामण पाटील यांच्या शेतीवर मजूर म्हणून काम करणारा बालाराम आणि यमुना (वय ३०) हे दोघे वीटभट्टीजवळील खोलीत दीड महिन्यांपासून राहतात. बालारामला दारूचे व्यसन आहे. तो दारूच्या नशेत यमुनाला शिवीगाळ व मारहाण करीत असे.
रविवारी रात्री बालाराम मित्रांसह पत्ते खेळत बसला होता. यमुना त्याला बोलवायला गेली.

यामुळे संतापलेल्या बालारामने हातातील स्टीलच्या कड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी यमुनाला बेदम मारहाण केली. त्यात गंभीर जखमी झालेल्या यमुनाचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

visit : policenama.com

You might also like