पैठण : एकाच कुटुंबातील तिघांची धारधार शस्त्राने हत्या

पैठण : पोलीसनामा ऑनलाईन – अख्खं कुटुंब संपविण्याच्या उद्देश्याने हल्लेखोरांनी पती, पत्नी, मुलगी अशा घरातील तिघांचा धारधार शस्त्राने भोसकून खुन केला. तर घरातील सहा वर्षाचा मुलगा मृत झाला असे समजून हल्लेखोराने सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे. पैठण शहरालगत नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी काठावरील जने कावसन गावात शनिवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून पैठण हादरल आहे.

राजू निवारे (वय 40) आश्विनी राजु निवारे (35) व मुलगी (10 ) अशी खुन झालेल्यांची नावे आहेत. हल्लेखोरांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला असून गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पैठणच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. पोलीस उप अधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट दिली आहे.

You might also like