बालतपस्वी शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांची हत्या, बाथरुममध्ये सापडला आणखी एकाचा मृतदेह, सर्वत्र प्रचंड खळबळ

नांदेड : उमरी तालुक्यातील नागठाणा येथील बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा एका माथेफिरुने गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. याचवेळी मठातील बाथरुममध्ये आणखी एकाचा मृतदेह मिळाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे़
उमरी तालुक्यातील नागठाण बु़ येथे महाराजांचा मठ आहे. गावातील एक माथेफिरु तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास महाराजांच्या मठात प्रवेश केला. त्यांनी महाराजांकडील ऐवज लुटला. त्याला महाराजांनी विरोध करताच त्याने गळा दाबून महाराजांना जीवे मारले. त्यानंतर तो महाराजांची गाडी घेऊन जात असताना शेजारील लोक जागे झाले. हे पाहून तो पळून गेला. लोकांनी मठात येऊन पाहिले तर महाराजांची हत्या झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. व महाराजाचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपासणी सुरु केली असताना बाथरुममध्ये आणखी एकाचा मृतदेह आढळून आल्याने सर्व जण चक्रावून गेले आहेत. भगवावन शिंदे असे मृत्यु पावलेल्याचे नाव आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेण्याचे काम पोलीस करीत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like