कोंढव्यात दोघांवर जीवघेणा हल्ला

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मित्राला घरी घेऊन जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या पालघनने वार करून दोघांवर जावघेणा हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री पावणे एकच्या सुमारास कोंढवा बु. येथे घडली.

याप्रकरणी शेखर आंबवले (३३, लोअर इंदिरा नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन तरुणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर यांना त्यांचे मित्र सचिन जागड याने फोन करून निवांत हॉटेलकडे बोलवले. त्यावेळी शेखर त्यांना आणण्यासाठी बुलेटवरून तिकडे गेले. त्यानंतर सचिन जागडेला भेटल्यावर त्याने घरी जायचे आहे असे सांगितल्यावर त्याला घेऊन ते कामठे पाटील रोड परिसरातील आनंद को ऑपरेटिव्ह सोसायटी येथे आले. ते सोसायटीच्या गेटजवळ असताना दोन जण पाठीमागून दुचाकीवरून आले. त्यातील एकाने काय भाऊ काय करतो म्हणून सचिन जागडे यांच्यावर पालघनने डोक्यात, शरीरावर वार करण्यास सुरुवात केल. त्यानतंर फिर्यादी सचिनला त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी गेले तेव्हा त्यांनाही पाघनने मारहाण करून गंभीर जखमी करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार करत आहेत.