अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच एकावर सपासप वार

अकोला : राज्यभरात आज ग्रामपंचातीची मतमोजनी करण्यात आली आहे. दरम्यान अकोल्यातील घुसर येथील ग्रामपंचायतीची मतमोजनी सुरु असतना अनुचित प्रकार घडला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु असलेल्या मतमोजनी वेळी दोन चुलत भावांमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान याचे रुपांतर भांडणात झाले असून एकाने चाकुने सपासप वार केल्याचा प्रकार समोर आले आहे. हा हल्ला पुर्व वैमनस्यातून घडला आहे. दिपक गोपनारायण यामध्ये जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलीसांना हा प्रकार निदर्शनात येताच त्यांनी घटनास्थळ गाठले व आरोपी सुरेशला ताब्यात घेतले. या भावांमध्ये आपसातील वाद असल्याने हा हल्ला झाल्याची माहिती पोलीसांना दिली आहे. याप्रकरणी आरोपी सुरेश याच्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.