इंस्टाग्रामवरील टॅगवरुन तरुणाला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका तरुणीला भावाने इन्स्टाग्रामवर केलेले टॅग काढून टाकण्यास सांगितल्याने चौघा जणांनी एका तरुणाला दुकानात शिरुन मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
नायर, हेमंत सोनार, सुनिल सोनार, ललित सोनार (रा. रामनगर, चिंचवड) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनिष महेंद्र भट्ट (वय२५, रा. साने चेंबर्स, मोरेवस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, मनिष यांचा भाऊ महेश महेंद्र भट्ट (वय १९) याच्या शाळेत शिकणाऱ्या युवतीने इन्स्टाग्राम या सोशल मिडियावर महेशला टॅग केले होते. म्हणून महेश याने तिला फोन करुन टॅग काढण्यास सांगितले होते. मनिष भट्ट हे रविवारी रात्री ११ वाजता मनिष मार्केट येथे दुकानात काम करीत असताना नायर व इतर तिघे जण आले व त्यांनी महेशची चौकशी केली. तो न सापडल्याने त्यांनी मनिष यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी फायटरच्या सहाय्याने मारहाण करुन जबर जखमी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us