खासदारकीचा राजीनामा दिलेल्या उदयनराजेंना मोठा ‘धक्का’ ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाली असल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्यांचे बंधू शिवेंद्रराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा ढासळला असल्याचे बोलले जात आहे. उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना आपला लोकसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला होता. त्याचबरोबर प्रवेश करताना त्यांनी काही अटी देखील ठेवल्या होत्या.

मात्र आज महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली. मात्र सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची मात्र घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे उदयनराजेंसाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे.या निवडणुकीची घोषणा करण्यात आलेली नसली तरी राष्ट्रवादीमधून अनेक जण या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माहितीनुसार याठिकाणी चार जण उमेदवारीसाठी इच्छुक असून आमदार शशिकांत शिंदे यांचे देखील नाव यामध्ये आघाडीवर आहे. तसेच श्रीनिवास पाटील, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते हेदेखील राष्ट्रवादीकडून इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

उदयनराजेंना पराभवाची भीती
भाजपमध्ये प्रवेश करतानाच उदयनराजेंनी हि निवडणूक विधानसभेबरोबर घ्यावी अशी विंनती केली होती. मात्र आजच्या घोषणनेनंतर आता त्यांना मोठा धक्का बसला आहे. तसेच वेगळी पोटनिवडणूक झाल्यास त्यांना पराभवाची भीती वाटत आहे, अशा चर्चा देखील राज्यभर रंगू लागल्या आहेत.

Visit – policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like