home page top 1

विधानसभा 2019 : बीडमध्ये काका JK Vs पुतण्या SK, लोकप्रिय कोण ? जाणून घ्या

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीचे वारे सध्या सर्वत्र वाहत आहे. निवडणूक आयोगाकडून कोणत्याही दिवशी विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. सर्वच राजकीय पक्ष विधानसभा निवडणूकीची तयारी करीत आहेत. त्यातच आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बीड जिल्ह्यातील 5 मतदार संघातील राष्ट्रवादींच्या उमेदवारांची घोषणा केली आहे.

राष्ट्रवादीला नुकतीच सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्‍त क्षीरसागर यांच्याविरूध्द राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा शरद पवार यांनी केली आहे. संदीप क्षीरसागर हे युवा नेते असून त्यांची बीड शहरात प्रचंड लोकप्रियता आहे. संदीप यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक संदीप क्षीरसागर आणि जयदत्‍त क्षीरसागर यांचे भविष्य ठरवणार आहे. हाजिर तो वजीर म्हणीसारखं होणार असून जो या निवडणूकीत जिंकणार आहे त्यांचं राजकीय भवितव्य उज्वल असणार आहे.

राष्ट्रवादीने जाहिर केलेले 5 उमेदवार –

बीड – संदीप क्षीरसागर
परळी – धनंजय मुंडे
माजलगाव – प्रकाश सोळंके
गेवराई – विजयसिंह पंडित
केज – नमिता मुंदडा

visit : policenama.com

Loading...
You might also like