‘या’ मतदार संघात चक्क शिवसेनेचे खासदार जाहिररित्या काँग्रेसच्या प्रचारात

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या कोल्हापूर दक्षिणमध्ये चर्चा आहे ती काँग्रेसचे तरुण उमेदवार ऋतुराज पाटील यांची. त्याला कारणं देखील तसेच आहे कारण शिवसेनेचे कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक हे जाहिररित्या ऋतुराज पाटील यांच्यासाठी प्रचार करत आहेत.

खासदार संजय मंडलिक यांनी जनतेला ऋतुराज यांच्यासाठी मतदानाचे आवाहन केले आहे. ऋतुराज पाटील यांचा जाहीर प्रचार करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. या व्हिडिओमध्ये मंडलिक म्हणताना दिसत आहेत की लोकसभेला युती धर्म म्हणून अमल महाडिक कधीही प्रचारात आले नाहीत, आता आम्हाला संधी आली आहे ती बंटी पाटलांच्या उपकारांची परतफेड करण्याची.

कोल्हापूर दक्षिणमध्ये काँग्रेसचे ऋतुराज पाटील आणि भाजपचे अमल महाडिक यांच्यात कडवी झुंज होणार असे दिसते आहे. लोकसभेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलं’ असे बॅनर लावत काँग्रेस उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार केला होता. या मदतीची परतफेड म्हणून काँग्रेसला म्हणजेच ऋतुराज पाटलांना मदत करण्याची भूमिका शिवसेनेचे खासदार मंडलिक यांनी घेतली आहे. एवढेच नाही तर संजय मंडलिक हे स्वत: घरोघरी जाऊन ऋतुराज पाटलांसाठी मतदानाचे आवाहन करत आहेत.

सतेज पाटील यांनी जाहीर कार्यक्रमात ऋतुराज पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती, त्यावेळी व्यासपीठावर खुद्द संजय मंडलिक देखील उपस्थित होते, त्यावेळी आपण स्वत: ऋतुराज यांच्या पाठीशी उभे असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. परंतू ते प्रचारात कोठेही दिसत नव्हते, आता प्रचाराचे शेवटी दोन दिवस असताना संजय मंडलिक स्वत: घरोघरी जाऊन ऋतुराज यांच्यासाठी प्रचार करताना दिसत आहेत. धनंजय मंडलिक या व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहेत की लोकसभेची परतफेड करण्याची संधी मिळाली आहे.

कोल्हापूरातून युतीमधून शिवसेना 8 तर भाजप 2 जागांवर निवडणूक लढवत आहेत. संजय मंडलिक यांच्या भूमिकेचा परिणाम कोल्हापूरातील इतर जागांवर देखील होण्याची शक्यता आहे. आम्हाला शहाणपणा शिकवण्यापेक्षा युतीधर्म पाळा अन्यथा भाजपकडे काम घेऊन येऊ नका असा दम चंद्रकांत पाटलांनी संजय मंडलिक यांना दिला होता, परंतू या इशाऱ्याकडे संजय मंडलिक यांनी कानाडोळा करत ऋतुराज पाटलांचा प्रचार करत आहेत.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like