home page top 1

‘फिर एक बार ‘शिवशाही’ सरकार, अब की बार 220 के पार’ घोषणेसह भाजपची राज्यात रथयात्रा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीच्या तयारी आधीच भाजप महाराष्ट्रात जलोष साजरा करणार आहे. कारण विधान सभा निवडणूकीत आधीच मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात भाजपच्या रथ यात्रेचे आयोजन केले आहे. या बाबतची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फिर एक बार, शिवशाही सरकार, अब की बार, 220 के पार ही घोषवाक्य रथ यात्रेत देण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांवर लक्ष देण्यास भाजपने सुरुवात केली आहे. त्यासाठीची जय्यत तयारी भाजपने सुरु केली आहे. त्यासाठीची रणनीति आखण्यास देखील भाजपने सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत रथ यात्रा काढणार असल्याचे सांगितले आहे.

भाजपकडून काढण्यात येणारी रथयात्रा येणाऱ्या ऑगस्ट महिन्यात असणार आहे. ही रथयात्रा राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातून जाणार आहे. लोकसभेत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर आता विधानसभेला महाराष्ट्रातून 220 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवशाही सरकार आणण्याचा संकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

आरोग्य विषयक वृत्त – 

आजारापासून बचाव करण्यासाठी ‘मुळा’ गुणकारी, रहाल निरोगी

मानसिक आजारांवर वेळीच उपचार करणे गरजेचे

अर्धवट झोपेमुळे होऊ शकतो व्यायामावर परिणाम

एक लिंबू ठरते आरोग्यासाठी फायदेशीर

Loading...
You might also like