महाराष्ट्रासह ‘या’ ३ राज्यात होऊ शकतात विधानसभा निवडणूका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या राज्यांसोबत जम्मू-काश्मीरमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड मध्ये ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊ शकतात. याचवेळी जम्मू-काश्मीरमध्ये देखील विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जाऊ शकतात असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

भाजपा निवडणुकीसाठी तयार
जरी विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची चर्चा सुरु असली तरी भाजपा निवडणुकीसाठी तयार झाला आहे. भाजपाने जम्मू-काश्मीरमधील राजकीय स्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी बैठक बोलावली आहे. ही बैठक जम्मू-काश्मीरमधील कोअर टीम सोबत होणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शाह, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, भाजपा महासचिव राम माधव, जम्मू-काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना आणि राज्यातील इतर भागातील नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच जम्मू-काश्मीरमध्ये १० हजार अतिरक्त सुरक्षा बलांना तैनात करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्य़काळ २ नोव्हेंबरला पूर्ण होत आहे. तर महाराष्ट्र विधानसभेचा कार्य़काळ ११ नोव्हेंबरला संपत आहे. तसेच झारखंडचा विधानसभेचा कार्य़काळ ५ जानेवारी २२० रोजी पूर्ण होत आहे. त्यामुळे या तिनही राज्यात एकत्र विधासनभा निवडणुका घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे झारखंडमध्ये वेळे आधीच निवडणुका होऊ शकतात.

आरोग्यविषयक वृत्त –