Assembly Election Resut : आसाम, केरळ, तामिळनाडूमधील चित्र स्पष्ट; जाणून घ्या कुणाची येणार सत्ता?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या चार राज्यासह पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये मतदारांनी कोणाला कौल दिला आहे, आहे आज स्पष्ट होणार आहे. आज सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल वगळता तामिळनाडू, पद्दुचेरीमध्ये सत्तांतर होण्याची चिन्हं सुरुवातीच्या काही फेऱ्यामध्ये दिसून येत आहेत. तर दुसरीकडे केरळ आणि आसाममध्ये अनुक्रमे एलडीएफ आणि भाजपला सत्ता राखण्यात यश येत आहे. तामिळनाडूत द्रमुकने आघाडी घेतली असून, आसाममध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. केरळमध्ये एलडीएफ तर पद्दुचेरीत भाजपने आघाडी घेतली आहे.

आसाममध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. मतदारांनी भाजपला पुन्हा एकदा पाठिंबा दिल्याचे सुरुवातीच्या पहिल्या मतमोजणीच्या काही फेऱ्यांमध्ये दिसून येत आहे. 126 जागा असलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 82 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 42 जागांवर पुढे आहे. आसाममध्ये बहुमताचा आकडा 64 आहे.

पद्दुचेरीमध्ये अल्पमतात आलेले सरकार कोसळले. राज्या पुन्हा काँग्रेस वापसी करणार का याकडे लक्ष लागले होते. मात्र या ठिकाणी भाजपने आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने केवळ 3 जागांवर आघाडी घेतली आहे. 30 जागा असलेल्या पद्दुचेरी विधानसभेत बहुताचा आकडा 16 आहे.

केरळमध्ये 140 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 71 आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये एलडीएप आघाडीवर आहे. एलडीएफने सध्या 89 जागांवर आघाडी घेतली आहे. तर युडीएफ 46 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे केरळमध्ये पुन्हा एकदा पिनराई विजयन यांची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत.

तामिळनाडूमध्ये 234 जागांसाठी मतमोजणी होत आहे. याठिकाणी बहुमताचा आकडा 118 आहे. चार तासांच्या मतमोजणीनंतर तामिळनाडूत द्रमुकने सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. सध्या द्रमुकने 140 जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी अण्णाद्रमुक 91 जागांवर आघाडीवर आहे. तर मक्कल नीधी मय्यम पक्ष 1 जागेवर आघाडीवर आहे. कमल हसन देखील कोईम्बतूर दक्षिण मधून आघाडीवर आहेत.