संजय राऊतांनी वर्तवलं 5 राज्यांच्या निकालाचं भाकित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन टीम – पाच राज्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम पुद्दुचेरीत कोणाची सत्ता येणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. सध्या सुरुवातीचे कल हाती येत असून पश्चिम बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. तर आसाममध्ये भाजप सत्ता राखेल अशी शक्यता आहे. केरळमध्ये सत्ताधारी डाव्यांनी मुसंडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निकालाबद्दल त्यांचा अंदाज सांगितला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना निवडणुकांबाबत भाकित वर्तवलं आहे. हे सगळ्यांन माहिती आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरी सोडून कुठेही सत्तापरिवर्तन होणार नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच सरकार बनवेल. केरळमध्येही सत्तापरिवर्तन होणार नाही. नंदीग्रामबाबत चर्चा काहीही होऊ दे. पण ममतादीदींच धैर्य मानायलाच हवं. त्या दोन जागांवर लढल्या नाहीत. त्या एकाच जागेवर लढल्या. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींना हरवणं सोपं नाही. पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचंच सरकार येणार, असे राऊत यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये ममतादींदीना पराभूत करण्यासाठी भाजपने जंगजंग पछाडलं. पण बंगालमध्ये ममतादीदींना हरवणं शक्य नाही. भाजपच्या जागा वाढणार आहेत. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे. देशात कोरोनाचं संकट असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री बंगालमध्ये तळ ठोकून होते. याबद्दल त्यांचं कौतुकच करायला हवे, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.