Assembly elections | संजय राऊतांचं आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान, म्हणाले – ‘शिवसेना अन् राष्ट्रवादी एकत्र लढले तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर (Assembly elections) घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस अन् कॉंग्रेस (Shiv Sena, Nationalist Congress, Congress) या 3 पक्षाचे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आले. आता या सरकारचा दीड वर्षांचा काळ लोटल्यानंतर कुरबुरींना सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून (Congress) स्वबळाचा नारा देण्यात आल्यानंतर आता शिवेसना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. राज्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (Shiv Sena and NCP) एकत्र येऊन निवडणूक लढले तर राज्यात चमत्कार होईल, असा दावा राऊत यांनी केला. Assembly elections | miracles state if shiv sena and ncp fight together sanjay rauts big statement

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी राऊत म्हणाले, राज्यातील काही पक्षांना स्वबळाचे अजीर्ण झाल आहे. भाजपाने (BJP) स्वबळाचे संकेत आधीच दिले आहेत. आता काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) हे स्वबळाची भाषा करत आहेत. आता उरले कोण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी स्वबळाची भाषा केली नाही. मात्र राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूका लढविल्यास चमत्कार होईल असे राऊत म्हणाले. दरम्यान, शिवसेना भवनासमोर काल झालेल्या राड्याबाबत राऊत म्हणाले की, शिवसेना भवन ही केवळ राजकीय वास्तू नाही तर ती महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या अस्मितेचे प्रतीक आहे. त्याकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिले, चाल करून आले तर त्यांना शिवप्रसाद मिळणारच. आता शिवप्रसादावरच थांबा, शिवभोजन थाळी देण्याची वेळ आणू नका, आमच्यासाठी हा विषय संपला आहे, असा इशाराच राऊतांनी भाजपला दिला आहे.

Wab Title :- Assembly elections | miracles state if shiv sena and ncp fight together sanjay rauts big statement

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Ministry of Defence | संरक्षण मंत्रालयात 10 वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या

SBI SCO Recruitment 2021 । सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती