Assembly Speaker Election | कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे?, काँग्रेसचा सवाल; साधला राज्यपालांवर निशाणा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे सरकार आल्यानंतर होऊ घातलेल्या विधानसभा अध्यक्षाची निवडणूक (Assembly Speaker Election) पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा कोर्टात प्रलंबित असल्याने राज्यपालांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) घेण्यास मनाई केली होती. त्यामुळे आता कोणत्या मुद्याच्या आधारे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे, असा सवाल काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Congress Leader Balasaheb Thorat) यांनी केला आहे.

 

राज्यातील ठाकरे सरकार (Thackeray Government) कोसळल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते (Shivsena Rebel Leader) एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची (CM) शपथ घेतली. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (BJP Leader Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या नवीन सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. तसेच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) पार पडणार आहे. त्याची प्रक्रियादेखील सुरु झाली असून यावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

 

बाळासाहेब थोरात यांनी म्हटले की, महाविकास आघाडीच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र, त्यावेळी राज्यपालांनी 15 मार्च रोजी राज्य सरकारला (State Government) पाठवलेल्या पत्रात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीचा मुद्दा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) प्रलंबित असल्याचे सांगितले होते आणि निवडणुकीस मनाई केली. मग, आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी काय घेतली जात आहे आणि कोणत्या नियमांतर्गत ही निवडणूक होणार आहे, असा सवाल त्यांनी केला. राज्यपालांनी तातडीने बहुमत (Majority) चाचणी आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक का घेतली असाही प्रश्न त्यांनी केला.

 

 

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधानसभा सदस्यांनी हात उंचावून करण्याचा ठराव मंजूर केला होता.
त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल (Petition Filed) करण्यात आली.
न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्याने दाद मागितली.
सुप्रीम कोर्टात ही याचिका प्रलंबित असल्याने राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारला अध्यक्षपदाची निवडणूक न घेण्याची सूचना केली होती.
त्यामुळे आता सत्तांतर झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari)
यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कशी जाहीर केली, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची थट्टा चालवली आहे ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे.
राज्याच्या इतिहासात याची काळ्या अक्षरात नोंद होईल, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

 

Web Title :- Assembly Speaker Election | maharashtra politics congress take objection on maharashtra assembly speakers election raised questions on governor koshyari decisions

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर मोठा हल्ला, म्हणाले – ‘सत्तेसाठी रातोरात झाला खेळ, हा…’

 

Ankita Lokhande Oops Moment | बोल्ड ड्रेसच्या नादात अंकिता लोखंडे झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

 

Tejasswi Prakash Gorgeous Look | तेजस्वी प्रकाशच्या साडीतील मादक अदावर चाहते झाले घायळ, पाहा व्हायरल फोटो…

 

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार कोल्हापूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 71 जणांवर कारवाई