Assembly Speaker Election | शिवसेना एक… व्हिप दोन, विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी शिवसेना आमदारांना व्हीप जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly Speaker Election) महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) राजन साळवी (Rajan Salvi) याची निवड करण्यात आली आहे. तर भाजपकडून (BJP) राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड करण्यात आली आहे. नार्वेकर आणि साळवी यांच्यात थेट लढत होणार आहे. आगामी काळात ‘अध्यक्ष महोदय’ असं कुणाला संबोधलं जाणार याचा निर्णय उद्या होणार आहे. दरम्यान या विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Speaker Election) शिवसेना आमदारांना व्हीप बजावण्यात (Shivsena Whip Issued) आला आहे.

 

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक (Assembly Speaker Election) रविवारी (दि.3) होणार आहे. दरम्यान शिवसेनेने आपला उमेदवार उभा केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेने राजन साळवी यांना निवडुन आणण्यासाठी सर्व आमदारांना व्हीप बजावला आहे. यामध्ये शिंदे गटातील आमदारांचा देखील समावेश आहे. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करत महाडचे आमदार भरत गोगावले (Mahad MLA Bharat Gogavale) यांची प्रतोदपती नियुक्ती केली आहे. शिंदे गटाने देखील या आगोदर व्हीप बजावला आहे. त्यामुळे शिंदे गट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला भाजपला मतदान करण्यासाठी व्हीप जारी करण्याची शक्यता आहे.

पक्षादेश मध्ये काय लिहलं?
महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन (Maharashtra Assembly Special Session) रविवार, दिनांक 3 जुलै 2022 आणि सोमवार 4 जुलै 2022 रोजी विधानभवन, मुंबई येथे घेण्यात येणार आहे.
रविवारी 3 जुलै रोजी महाराष्ट्र सभागृहात अध्यक्षांची निवड होणार आहे. या पदासाठी शिवसेना पक्षातर्फे राजन साळवी यांनी अर्ज भरला आहे.
या निवडणुकीत शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांनी मतदानात सहभागी व्हायचे असून साळवी यांना मतदान करावे, असा पक्षादेश आहे.

 

आता शिवसेनेत दोन गट पडल्याने आमदार कोणता पक्षादेश पाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत कुणाची सरशी होणार हे स्पष्ट होईल.

 

Web Title :- Assembly Speaker Election | shivsena whip issued to shiv sena mlas for assembly speaker election maharashtra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Amravati Crime News | अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर कारवाई करा; खा. नवनीत राणांचे गृहमंत्री शहांना पत्र

 

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

 

सम्राट अशोकचा हा खजिना शोधण्यासाठी Ratan Tata यांनी केली होती मदत, अनेक वर्षांपूर्वीची आहे ही गोष्ट!