नगरसेवक धीरज रामंचद्र घाटे यांच्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि व्हेंटिलेटरची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महासंकटातील दुस-या लाटेमध्ये परिस्थिती बिकट बनली आहे. लॉडाउनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. रुग्णांसमोरील समस्या देखील गंभीर स्वरुपाच्या आहेत. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने समाजाच्या सोबत ठामपणे उभे राहिले पाहिजे, ही मा. चंद्रकांतदादा पाटील यांची सूचना शिरोधार्य आहे. कोविड काळात प्रत्येक समाज घटकाच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा पुढे नेत आपण उद्या मा. दादांच्या उपस्थितीत पाच उपक्रमांचा प्रारंभ करतो आहोत.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ही सध्या महत्त्वाची गरज बनली आहे. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी, डिस्चार्जनंतर किंवा हॉस्पिटलऐवजी पर्याय म्हणून हे साधन उपयुक्त ठरते आहे. शनिवार 15-5-2021 आज दुपारी तीन वाजता आपण नागरिकांच्या सुविधेसाठी सात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मोफत उपलब्ध करून देणार आहोत. लोकमान्य नगरमध्ये उद्या दुपारी तीन वाजता मा. चंद्रकांतदादांच्या हस्ते हा लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

पुण्यनगरीचे खासदार गिरीष बापट, माजी खासदार संजय काकडे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ आणि मुक्ताताई टिळक, नगरसेविका स्मिताताई वस्ते, सरस्वतीताई शेंडगे आणि नगरसेवक रघुनाथ गौडा आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहणार आहेत.

कोरोना आणि लॉकडाउनमुळे आर्थिक परिस्थिती बिघडलेल्या नागरिकांना फूल ना फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. त्यामध्ये पहिल्या कार्यक्रमात आपण १०० रिक्षाचालकांना महिनाभराचा धान्य शिधा उपलब्ध करून देणार आहोत. हा कार्यक्रम नवी पेठ विठ्ठल मंदिराजवळील रिक्षा स्टँड येथे पार पडणार आहे. नंतर सर्व्हे क्र. १३३ दांडेकर पूल येथे दोन कुटुंबांना दादा भेट देतील. कोरोना संकटामुळे ज्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे प्राण गेले आणि कुटुंब अडचणीत सापडले, अशा दोन कुटुंबांना आपण मदतीचा हात देऊन त्यांची जबाबदारी उचलणार आहोत.

पुणे महानगरपालिका आणि सकाळ रिलीफ फंड यांच्यावतीने गणेश कला क्रीडा मंच येथे चालविण्यात येणा-या कोविड हॉस्पिटलला चंद्रकातदादा भेट देणार आहेत. तिथे आपल्या पुढाकारातून एक व्हेंटिलेटर देण्यात येणार आहे. तिथे व्हेंटिलेटरची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपण ही मदत त्या ठिकाणी करणार आहोत.

यावेळी मा. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीताताई वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते गणेश बिडकर आदी यावेळी उपस्थित असणार आहेत.

सरतेशेवटी साने गुरूजी नगरमध्ये साधारण सव्वा चार वाजण्याच्या सुमारास वीस महिलांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या वस्ती विभागात राहणा-या वीस महिलांना ही शिलाई मशीन्स वितरीत करण्यात येतील. महिलांनी स्वावलंबी व्हावे आणि घरच्या घरी काम करून चार पैसे कमावून कुटुंबाला हातभार लावावा, हा त्या मागील हेतू आहे.

हे सर्व कार्यक्रम कमीत कमी संख्येमध्ये आणि कोविड काळातील सर्व नियम नि निर्बंधांचे पालन करून पार पडणार आहेत.