सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांची पुण्यात बदली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गृह विभागाने 2 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. सहाय्यक आयुक्त विनोद बाबू चव्हाण आणि सतीश रघुवीर गोवेकर अशी बदली करण्यात आलेल्या अधिकार्‍यांची नावे आहेत. त्यांच्या बदली बाबतचे आदेश अप्पर पोलिस महासंचालक (आस्थापना) कुलवंत कुमार सारंगल यांनी काढले आहेत.

बदली झालेल्या पोलिस अधिकार्‍याचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली आहे ते पुढील प्रमाणे.
1. विनोद बाबू चव्हाण (सहाय्यक पोलिस आयुक्त, लोहमार्ग, मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, नवी मुंबई)
2. सतीश रघुवीर गोवेकर (सहाय्यक पोलिस आयुक्त, नवी मुंबई ते सहाय्यक पोलिस आयुक्त, पुणे शहर)