रायगड नगररचना सहाय्यक संचालकास ४० हजाराची लाच घेताना अटक

अलिबाग : पोलीसनामा ऑनलाईन

अलिबाग येथील रायगड जिल्हा नगररचना कार्यालयातील सहाय्यक संचालकास (वर्ग-1) ४० हजार रुपयांची लाच घेताना रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक विवेक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी संध्याकाळी साडेपाच वाजता रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई  नगररचना कार्यालयातील केबीन मध्ये करण्यात आली.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’980f0941-c342-11e8-af97-a9b386f21d83′]

किशोर दत्तात्रेय गिरोल्ला असे लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या सहाय्यक संचालकाचे नाव आहे.

अलिबाग तालुक्यांतील म्हात्रोळी गावांतील बांधकांमास भोगवटा दाखल्याकरीता आवश्यक अभिप्राय अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविण्याच्या सरकारी कामा करिता सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांने या बांधकामाचे बांधकाम संल्लागार यांच्याकडे शुक्रवारी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती लाचेची रक्कम 40 हजार रुपयांवर आली. बांधकाम सल्लागार यांनी तत्काळ रायगड लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जावून या बाबत रितसर तक्रार दाखल केली. तक्रारी बाबत तत्काळ खातरजमा करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरक्षक किरण बकाले यांच्या पथकाने नगररचना कार्यालयात आणि गिरोल्ला याच्या केबीन सापळा रचून त्यास 40 हजार रुपयांची लाच घेताना शिताफीने अटक केली आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9d079e45-c342-11e8-aac8-d9f9122d203a’]

सहाय्यक संचालक (वर्ग-1) किशोर दत्तात्रेय गिरोल्ला यांच्या विरुद्ध अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पूढील तपास पोलीस निरक्षक किरण बकाले हे करित आहेत. सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलीसनामा ऑनलाईन : महत्वाच्या बातम्या एका क्लिकवर एकाच ठिकाणी