1000 रुपयाची लाच स्विकारताना सहायक पोलीस निरीक्षक (API) अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – अदखलपात्र गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी ९ हजार रुपये घेतल्यानंतरही उरलेले १ हजार रुपये घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ पकडले. संदीप सुरेश बोराडे (वय ३४, रा. भीमा सोसायटी, कल्याण पूर्व) असे अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका ४७ वर्षाच्या तक्रारदाराने तक्रार दिली आहे.

कोलसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्याबाबत संदीप बोराडे यांनी या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी तसेच या पुढे सहकार्य करण्यासाठी त्यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ९ हजार रुपये तक्रारदाराने दिले होते. त्यानंतर त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार गुरुवारी याची पडताळणी केली. त्यात बोराडे यांनी लाचेची मागणी केल्याचे आढळले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळी नऊ वाजता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून एक हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सरकारी कामासाठी लोकसेवक लाचेची मागणी करीत असल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या १०६४ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

आरोग्यविषयक वृत्त –

 

Loading...
You might also like