सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे (API) तडकाफडकी निलंबन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सोनगीर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षख दिलीप खेडकर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिग दोर्जे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहे.

निमगुळ येथे झालेल्या बस अपघाताच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिग दोर्जे गेले होते. दरम्यान दोंडाईचा व धुळे शहरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा होता. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यादरम्यान त्यांची सभा स्थळ आणि रोड शो होणार होता. त्याचा बंदोबस्त असल्याने ते परतत असताना त्यांनी अचानक सोनगीरी पोलीस ठाण्याला भेट दिली.

विशेष पोलीस महानिरीक्षक छोरिग दोर्जे यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली असता त्या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर हे त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. तसेच दंगा काबूसाठी लागणारे साहित्य पोलीस ठाण्यात प्रथम दर्शनी भागात ठेवले नसल्याचे त्यांना दिसून आले. खेडकर यांनी कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत त्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी सपोनि सरीता कोळापे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

You might also like