धुळे : एसआरपी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – सरेंडर बिल मंजुरीसाठी 500 रुपयांची लाच मागणार्‍या धुळे एस.आर.पी दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रणवीरसिंग राजपूत यास धुळे एसीबीच्या पथकाने गुरुवार, (दि.7) रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास साक्री रोड परीसरातील कार्यालयातून अटक केली आहे .

ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर व सहकार्‍यांनी केली. या कारवाईने लाचखोर अधिकारी व कर्मचार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. तक्रारदार हा एसआरपीचा कर्मचारी असून त्यांच्याकडे रजा रोखीकरण बिल (सरेंडर बिल) मंजूर करण्यासाठी आरोपी रणवीरसिंग राजपूत याने 500 रुपयांची मागणी केली होती . मात्र तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर गुरूवारी आरोपीला लाच घेताना अटक करण्यात आली आहे .

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like