सहाय्यक पोलिस निरीक्षकाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हयातील गोंदी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे संपुर्ण जालना शहरासह पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजु शकलेले नाही.

हेही वाचा – पुलवामा दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा 

सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल परजणे असे त्यांचे नाव आहे. ते बीड जिल्ळयातील शिरूर तालुक्यातील खालापुरी येथील रहिवाशी होते. त्यांच्या कशामुळे आत्महत्येचे पाऊल उचलले याबाबत सध्या चर्चा झालु आहे. सहाय्यक निरीक्षकाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे समजताच वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अत्यंत मनमिळावु स्वभावाचे परजणे असे काही करतील असे कोणाला देखील वाटत नव्हते. मात्र, त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यावर सर्वप्रथम कोणालाही विश्‍वास बसला नाही पण नंतर मिळालेली माहिती खरी असल्याचे समोर आले.

अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तथा ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल परजने यांनी आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास गोंदी गावातील राहत्या रूम मध्ये सर्व्हिस रिवाल्वर मधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.