सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य गुन्हे अन्वेषण विभागांतर्गत कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश येमुल यांचे गुरुवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

नगरचे माजी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सुरक्षा टीममध्येे ते प्रतिनियुतीवर होते. त्यांच्या आयटी सेलचे कामही येमुल पहात होते. सायबर तज्ज्ञ म्हणून येमुल यांचा लौकिक होता. गुरुवारी रात्री पुण्यात त्यांचे निधन झाले. आज नगरमधील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

येमुल हे मूळ नगरचे रहिवासी आहेत. सध्या नोकरीनिमित्त पुण्यात वास्तव्यास होते. रात्री अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like